रास्तारोकमध्ये सहभागी कार्यकर्ते. 
मराठवाडा

Vidhan sabha 2019 : भाजपचा बालेकिल्ला सोडला शिवसेनेला, कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

सुधाकर दहिफळे

रेणापूर (जि. लातूर) - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याच्या निषेधार्थ आज (ता. चार) पिंपळफाटा (रेणापूर) येथे भाजप कार्यकर्त्यांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. 

रेणापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व तब्बल 25 वर्षे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केले. मतदार संघाच्या पुनर्रचनेत हा तालुका लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात समाविष्ट झाला. या मतदार संघात मुंडे यांना माननारा मोठा वर्ग आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात भाजपाची मोठी ताकद असल्याने यावेळी रमेश कराड यांनी मोठी तयारी करूनही ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला. यामुळे कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली. रेणापूर नगरपंचायत पंचायत समितीसह अनेक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात असतानाही पक्ष नेतृत्वाने हा मतदारसंघ सेनेला सोडल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी तासभर रास्ता रोको आंदोलन करून 'परत द्या, परत द्या लातूर ग्रामीण परत द्या' अशा घोषणा देत पिंपळफाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. 

आंदोलन सुरू आसताना मोठा पाऊस आला तरीही कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले.  सभापती अनिल भिसे, तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, अनंत चव्हाण, वसंत करमुडे, श्रीकिसन जाधव, शरद दरेकर, रमेश सोनवणे यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनीधी, पदाधिकारी, अनेक गावचे सरपंच, चेअरमन, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT